नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते राज ठाकरे यांचा रामदेवबाबांना सल्ला

Foto

राज ठाकरे यांनी आता योगगुरु बाबा रामदेव यांना लक्ष्य केले आहे. आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी रामदेव बाबांना टोला मारला आहे. नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी पुढील पंतप्रधान कोण होईल हे सांगणं कठीण असल्याचं म्हटलं होतं. याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी रामदेव बाबा यांच्यावर टीका करत नेत्रासन करण्याचा सल्लाच दिला आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1078630753708244992

राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही दाखवलं आहे. रामदेव बाबा दोघांकडेही पाहत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. बाजूला रामदेव बाबा यांचं पुढील पंतप्रधान कोण होईल हे सांगणं कठीण असल्याचं वक्तव्य लिहिण्यात आलं असून कंसात मोदी प्रशंसक लिहिलं आहे. यामुळेच राज ठाकरे यांनी त्यांना नेत्रासन कऱण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे दृष्यी सुधारते असंही उपहासात्मकपणे लिहिण्यात आलं आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker